By  
on  

माधुरी दीक्षितने यासाठी मानले ‘पंचक’च्या टीमचे आभार

माधुरी दीक्षित तिच्या आगामी पंचक या सिनेमातून रसिकांच्यी भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. माधुरीने या सिनेमाचं गोव्यात शुटिंगही सुरु केलं आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, भारती आचरेकर, सतीश आळेकर, दीप्ती देवी, आशिष कुलकर्णी आणि नंदिता पाटकर यांच्या भूमिका आहेत. माधुरीने नुकतंच ‘पंचक’च्या टीमचे आभार मानले आहेत.

 

याला कारण असं या सिनेमाचं गोव्यात शुटिंग सुरु असताना ‘क्यार’ नावाचं चक्रिवादळ धडकण्याची शक्यता होती. त्यानुसार सर्वत्र रेड अलर्टही जाहीर केले होते. पण टीमने न थांबता अगदी शेड्युलनुसार काम केलं आहे. त्यामुळे माधुरीने टीमचे आभार मानले आहेत. ‘पंचक’ची पार्श्वभूमी प्रथेशी निगडीत असली तरी त्याचा बाज विनोदी आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive