By  
on  

खारी-बिस्कीटची गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत: संजय जाधव

संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी बिस्कीट हा सिनेमा रसिकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. या निमित्ताने संजय जाधव यांनी पीपिंगमूनशी संवाद साधला. संजय म्हणतात, ‘ खारी बिस्कीट हा सिनेमा माझ्यासाठी खास आहे. कारण हा माझा 50 वा सिनेमा आहे. पण माझ्या इथंपर्यंतच्या प्रवासाचं श्रेय त्या त्या सिनेमांच्या टीम्सनाही द्यावं लागेल. खरं तर दिग्दर्शकासाठी त्याच्या सिनेमाचा प्रत्येक शुक्रवार महत्त्वाचा असतो.

 

 

असाच एखादा शुक्रवार येतो आणि आपलं आयुष्य बदलवणारा ठरतो. माझ्या आयुष्यात असे अनेक शुक्रवार आले आहेत. जे माझं आयुष्य बदलवणारे ठरले. माझ्या या प्रवासाचा खारी बिस्किट हा सिनेमा भाग होणार आहे. याचा मला आनंद आहे. खारी बिस्कीट ही अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच जिच्यावर आपण निरपेक्ष प्रेम करत असतो. याच प्रेमाची गोष्ट या सिनेमात दाखवली जाणार आहे. याच निरपेक्ष प्रेमाचा अनुभव मला एका मित्राकडूनही आला.

संजय नार्वेकर माझा मित्र आहे. त्याला मी अशाच एका रात्री फोन केला आणि उद्या लगेच माझ्या सिनेमासाठी शूट करशील का विचारलं. त्याने भूमिका कोणती, सिनेमा कोणता, पैसे किती याबद्द्ल काहीही न विचारता काम करण्यास होकार कळवला. मला वाटतं अशाच निरपेक्ष प्रेमाचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतला असेलच. खारी बिस्किट पाहाताना तुम्हालाही ते जाणवेल.’

Recommended

PeepingMoon Exclusive