By  
on  

‘पानिपत’मध्ये झळकणार रवींद्र आणि गश्मीर महाजनी ही बाप-लेकाची जोडी

सध्या चर्चा आहे ती आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानीपत’ या  मल्टिस्टारर आणि बिग बजेट बॉलिवूडपटाची. एकीकडे या सिनेमात अर्जुनच्या कास्टींगमुळे ट्रोल होत असताना या सिनेमातील एक एक लूक समोर येत आहेत. आता या सिनेमातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा लूक समोर आला आहे. सिनेसृष्टीतील हॅण्डसम अभिनेते रवींद्र महाजनी हे या सिनेमात मल्हारराव होळकरांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. 

 

 

‘देऊळबंद’ सिनेमानंतर रवींद्र थेट हिंदी सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहेत. मराठी सिनेमातील हॅण्ड्सम अभिनेते म्हणून रवींद्र महाजनींची ओळख आहे. मुंबईचा फौजदार, झुंज, दुनिया करी सलाम, देवता या मराठी सिनेमातून त्यांनी खास ओळख बनवली. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या ‘सात हिंदूस्थानी’ सिनेमातही ते झळकले होते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हर हर महादेव! #jankojishinde #panipat #6december

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 

विशेष म्हणजे पानीपतमध्ये रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील झळकणार आहे. गश्मीर या सिनेमात जनकोजी शिंदे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळे हे बापलेक या सिनेमात कशी धमाल करतात ते लवकरच दिसेल. हा सिनेमा 6 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive