By  
on  

हृषिकेश जोशी- प्रियदर्शन जाधव 'तेरी भी चुप' नाटकात एकत्र

मराठी नाटकांमध्ये सध्या वैविध्यपुर्ण विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तरुणाईला आकर्षित करणारे वैविध्यपुर्ण विषय घेऊन ही नाटकं नाट्यप्रेमी रसिकांना आवडत आहेत. असाच एक नवा विषय घेऊन "तेरी भी चुप' हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या नाटकाचा विषय अद्याप गुलदस्त्यात असला तरीही नाटकाची स्टारकास्ट काहीशी हटके असलेली दिसुन येत आहे. हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, सुखदा खांडकेकर, मधुरा पालांडे आदी कलाकार या नाटकात भुमिका साकारणार आहेत. नाटकातील या कलाकरांचं पोस्टर प्रसिद्ध झालं असुन प्रत्येकाच्या तोंडावर बोट असलेलं दिसुन येत आहे. 

'प्रवेश' आणि 'मोतलिंग' प्राॅडक्शन निर्मित 'तेरी भी चुप' नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तेजस रानडे यांनी या नाटकाचं लेखन केले आहे. हे नाटक लवकरच रंगभुमीवर येणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive