By  
on  

सिद्धार्थ चांदेकर ऑस्ट्रेलियात भेटला या लाडक्या व्यक्तीला

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. या ट्रीपचे अनेक फोटो ते सोशल मिडियावर शेअर करत असतात. आताच सिद्धार्थने त्याच्या आवडत्या शेफसोबत फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थ ऑस्ट्रेलियात शेफ सशी चेलिह यांना भेटला. सशी 2018च्या मास्टर शेफ ऑस्ट्रेलियाचे विजेते आहेत.

 

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थ म्हणतो, ‘ फॅनबॉय मोमेंट ! आज शेफ सशी चेलिह यांना भेटलो. ते खुपच मनमिळावू आणि नम्र आहेत. या भेटीने आनंद दिला. धन्यवाद सशी !!....’ 
 सिद्धार्थ चांदेकर अलीकडे जीवलगा या मालिकेत दिसला होता. तो ऑस्ट्रेलियात मैत्रिण मिताली मयेकरसोबत आहे. या जोडीने काही महिन्यांपुर्वी साखरपुडा केला होता आता त्यांच्या लग्नाची वाट चाहते पाहात आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive