By  
on  

या नाटकातुन अमोल पालेकर 25 वर्षांनी परतणार रंगभुमीवर

भारतीय सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी स्वतःच्या अभिनयातुन अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांमधुन स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. अमोल पालेकर आता तब्बल 25 वर्षांनी रंगभुमीवर परतत आहेत. 

'कुसुर- द मिस्टेक' या हिंदी नाटकामध्ये ते काम करत आहेत. संध्या गोखले यांनी या नाटकाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या नाटकामध्ये एका निवृत्त एसीपी अधिका-याच्या भुमिकेत अमोल पालेकर दिसणार आहेत. या नाटकामध्ये भुमिका करताना शारीरीक आणि मानसिक कसोटी लागत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

24 नोव्हेंबरला अमोल पालेकर यांचा वाढदिवस आहे. अमोल पालेकर या वाढदिवसाला वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये प्रवेश करत आहेत. यानिमित्ताने मुंबईतील एनसीपीए मध्ये या नाटकाचा प्रयोग आयोजीत करण्यात आला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive