By  
on  

बालदिनाचा मुहुर्त साधत ‘बेरीज वजाबाकी’ सिनेमाचा टीजर रिलीज

लहानपणी गणितात आपण बेरीज-वजाबाकी शिकलो आहोत. हीच बेरीज वजाबाकी आता सिनेमात पाहायला मिळणार आहे पण काहीशा वेगळ्या अर्थाने. राजू भोसले दिग्दर्शित बेरीज-वजाबाकी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला हा सिनेमा मोठ्यानाही काही शिकवून जाईल असाच आहे. 

 

उपेंद्र लिमये, मोहन जोशी, नंदू माधव, देविका दफ्तरदार हे कलाकार आहेत. याशिवाय नील बक्षी, जुई रहाळकर, अमेय परदेशी, आदिश्री कुलकर्णी, यश भालेराव, आर्य काकडे, शर्व कुलकर्णी हे बालकलाकार देखील आहेत. अनेकदा पालक मुलांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यात रमून जातात. पण मुलांना पालक कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा जास्त हवे असतात हे ते विसरतात. हा सिनेमा याच विषयावर भाष्य करत आहे. बाल कलाकारांची मांदियाळी असलेला हा सिनेमा 6 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive