By  
on  

‘त्रिभंगा’च्या सेटवरून वैभव तत्त्ववादीने काजोलसोबतचा हा फोटो केला शेअर

अभिनेता वैभव तत्त्ववादी रेणुका शहाणे दिग्दर्शित त्रिभंगा या नेटफ्लिक्स सिनेमात झळकणार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. या सिनेमात काजोल आणि अजय देवगण ही जोडीही वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. वैभव तत्ववादीने नुकतंच काजोल सोबतचा फोटो सोशल मिडियावरून शेअर केला आहे. 

 

या फोटोला कॅप्शन देताना तो म्हणतो, ‘ अनेकदा केवळ सद्भावनेने आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणारी व्यक्ती. तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा होता. खुप प्रेम काजोल मॅडम’. 
त्रिभंगा ही तीन पिढ्यांच्या महिलांवर आधारित कथा आहे. या तिघांशिवाय मिथिला पालकर, तन्वी आजमी और कुणाल रॉय कपूर हे कलाकार देखील या सिनेमात आहेत. अजय देवगण फिल्म्स और बनिजय एशिया हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive