By  
on  

'#पुन्हानिवडणूक?' बाबत कलाकारांनी दिलं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणतात

एकीकडे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा प्रश्न ऐरणीवर असताना आज एक नवाच वाद निर्माण झाला. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर आणि अंकुश चौधरी या कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग सोशल मिडियावर ट्रेंड केला. पण या हॅशटॅगवरून नेटकरी मात्र त्यांच्यावर चांगलेच उखडले. पण या कलाकारांच्या हॅशटॅगच कारण मात्र  काही भलतंच आहे. या कलाकारांनी त्यांच्या आगामी ‘धुरळा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे सगळं केल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.  

 

 

याच संदर्भात सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकरने खुलासा केला आहे. या दोघांनीही सोशल मिडियावर या हॅशटॅग बद्दल खुलासा केला आहे. सिद्धार्थ म्हणतो, ‘”आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. 

राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही”. 

 

 

तर सईने याच आशयाची पोस्ट ट्वीट केली आहे. आता या खुलाशानंतर या कलाकारांवरील नेटिझन्सचा राग कमी होईल अशी आशा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive