By  
on  

‘मिमी’ च्या सेटवरून सई ताम्हणकरने शेअर केला हा फोटो

सई ताम्हणकर सध्या राजस्थानमध्ये ‘मिमी’ सिनेमाचं शुटिंग करत आहे. सरोगसीच्या विषयावर आधारलेल्या या सिनेमात सईसोबत कृती सॅनॉनही झळकणार आहे. मराठी सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ यावर मिमी हा सिनेमा बेतला आहे. सरोगसीवर आधारलेल्या या मराठी सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

 

'मिमी'  या बॉलिवुड सिनेमात उर्मिला कानेटकरने साकारलेली प्रमुख भूमिका कृती सनॉन साकारते आहे. या सिनेमाच्या दरम्यान सई आणि कृतीमध्ये चांगलंच बाँडिंग झालं आहे. सई अनेकदा तिचे आणि कृतीचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.  लक्ष्मण उतेकर या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Peek-A-Boooooo !!! #shootlife #saitamhankar #kritisanon #mimi @aasifahmedofficial

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive