By  
on  

रिंकू राजगुरुचं वेबप्लॅटफॉर्मवर पदार्पण, लारासोबत झळकणार आर्ची?

सैराटला येऊन तीन वर्षं होऊन गेली तरी रिंकूची जादू कमी झाली नाही. आजही तिला आर्ची म्हणूनच अनेक ठिकाणी ओळखलं जातं. सैराटनंतर रिंकूने काही काळ काम करणं थांबवलं होतं. पण त्यानंतर तिने ‘कागर’ या सिनेमातून पदार्पण केलं. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर तिच्या मेक अप या सिनेमाची चर्चा आहे. ती यात चिन्मय उदगीरकर याच्यासोबत दिसणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Picture Courtesy: @akki_paranjape_

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

पण आता रिंकूसाठी आणखी एका संधीचं दालन उघडलं आहे. रिंकू आता वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. ही रिंकूसाठी मोठी संधी असणार आहे. विशेष म्हणजे रिंकूसोबत या वेबसिरीमध्ये लारा दत्ताही दिसणार आहे. रिंकूने या वेबसिरीजच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Always look on the bright side

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

या वेबसिरीजचं नाव अजून समोर आलं नसलं तरी रिंकूच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असणार यात शंका नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

WORRY LESS,SMILE MORE. DON'T REGRET,JUST LEARNAND GROW. Pic:@shunyaabhiyash

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive