By  
on  

कोर्टाने जारी केला अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोधात जामीनपात्र वॉरंट

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात कोर्टाने  जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. कोर्टात हजर न राहिल्याने एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्यावेळी प्राजक्तावर शो दरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून  फॅशन डिझायनरने मारहाण केल्याचा आरोप केला होता. जान्हवी मनचंदा या फॅशन डिझायानरने प्राजक्ताविरोधात काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

या प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही व्हायरल झाला होता. जान्हवीने या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यावर प्राजक्ताने तिला ‘तुझ्यासोबत झालेल्या प्रकाराला मारहाणीचं नाव देऊ नको. माझे वडील पोलिस आहेत आणि माझे काका वकिल असल्याने मारहाण कशाला म्हणतात हे मला चांगलं ठावूक आहे. 

 

तरीही तुला तक्रार करायची असेल तर करू शकतेस. पण तुझ्या या आतातायीपणा खाली तुझी चुक आणि बेजबाबदार वर्तन लपवू नको.’ असा मेसेज प्राजक्ताने जान्हवीला केला होता. पणा तरीही जान्हवीने तक्रार दाखल केली होती. आता या वॉरंटवर प्राजक्ताची काय प्रतिक्रिया असेल हे लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive