By  
on  

अजय देवगणच्या ‘तानाजी’मध्ये मराठमोळ्या कलाकरांनी उमटवला ठसा, जाणून घ्या

अजय देवगणच्या बहुचर्चित तानाजी: द अनसंग वॉरियर' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये तानाजीचा पराक्रम, शिवाजी महाराजांची राज्यनिती आणि उदयभानचा द्वेष पाहायला मिळत आहे. 

तानाजीमध्ये मराठमोळे कलाकारही मोठ्या प्रमणावर आहेत. अजयच्या यापुर्वीच्या अनेक सिनेमांमध्ये मराठी कलाकार दिसले आहेत. अशोक सराफ, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर या कलाकारांनी अजयसोबत यापुर्वीही काम केलं आहे. विशेष म्हणजे मराठमोळ्या काजोलनेही तानाजीमध्ये मराठमोळा रोल केला आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच काजोलने मराठी व्यक्तिरेखा साकारली आहे.  

 

 

आताही तानाजीमध्ये शरद केळकर, देवदत्त नागे, अजिंक्य देव हे कलाकार दिसणार आहेत. देवदत्त नागेचा हा दुसरा बॉलिवूड सिनेमा आहे. पिळदार शरीरयष्टीच्या देवदत्तने यापुर्वी ‘सत्यमेव जयते’ या सिनेमामध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. या सिनेमामध्ये देवदत्त नागे सुर्याजी मालूसरेंंच्या भूमिकेत दिसत आहे.

अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  भूमिकेत आहेत, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. महाराजांच्या व्यक्तिरेखेतील त्यांचा फर्स्ट लुक येताच नेटक-यांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला. महाराजांच्या व्यक्तिरेखेत शरद केळकर अगदी हुबेहूब दिसतायत. अजिंक्य देव आणि ऐतिहासिक सिनेमे हे जणू समीकरणच झालं आहे. 'तानाजी द अनसंग वॉरियर' या सिनेमात  अजिंक्य देव सुर्याजी पिसाळांच्या भूमिकेत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive