By  
on  

जाणून घ्या प्रशांत दामले, प्रसाद ओकला का म्हणत आहेत ‘तू म्हणशील तसं’

रंगभूमी दिनाचं औचित्य साधून प्रसाद ओक आणि प्रशांत दामले नव्या नाट्यकृतीमधून रसिकांच्या समोर येत आहेत हे आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं. ही जोडी रंगभूमीवर एकत्र काम करणार असल्यामुळे नाट्यप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हे दोघंही ‘तू म्हणशील तसं’ या नाटकामधून रसिकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाचा प्रोमो रसिकांच्या भेटीला आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

या प्रोमोमध्ये प्रशांत दामले प्रसादला ब्रो! मलाही तुझ्या नाटकात घे ना असं म्हणताना दिसतात. यासोबतच मी तुला 28 चा वाटतो ना ? हे देखील विचारतात. यावर प्रसाद 'अरे तू 22 चा वाटतोस, त्यामुळेच मी तुला नाटकात घेणार नाही'. असं उत्तर देतात. 
आता या जोडीची जुगलबंदी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येईल. प्रसाद यापुर्वी 'नांदी' या नाटकातून रंगभूमीवर आला होता. ‘तू म्हणशील तसं’ मध्ये तो दिग्दर्शक म्हणून समोर येतो की अभिनेता म्हणून याची उत्सुकता कायम आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive