By  
on  

जेव्हा सचिन पिळगावकर अवधुत गुप्तेला सिनिअर समजतात...

अभिनय, दिग्दर्शन, गायन, संगीत या सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेले सचिन पिळगावकर यांनी एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. सचिन पिळगावकर यांनी 'आयडियाची कल्पना' या सिनेमाला संगीतही दिलं आहे. अवधुत गुप्ते याने या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन करत होता. पण यातील दोन गाण्यांना सचिन यांनी चाली दिल्या. यासोबतच गाण्यांचं संगीत दिग्दर्शनही केलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Looking ahead ️️

A post shared by Sachin Pilgaonkar (@sachinpilgaonkar) on

 

 

संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा होता. या गाण्यांना संगीत दिल्यामुळे सचिन पिळगांवकर यांचं पहिल्यांदा संगीतकार म्हणून नाव या सिनेमाच्या क्रेडिट लिस्टमध्ये झळकले. पण त्यांनी संगीतकार म्हणून नाव देण्याआधी अवधूत गुप्तेपुढे एक अट ठेवली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Pilgaonkar (@sachinpilgaonkar) on

 

ती अशी की 'जर माझं नाव संगीतकार म्हणून देण्यात येणार असेल, तर माझं नाव अवधुतच्या नावाच्या नंतर येईल. कारण संगीतकार म्हणून हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने मी संगीतकार या क्षेत्रात अवधुतपेक्षा ज्युनिअर आहे’. 
एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहुणे परिक्षक म्हणून सचिन पिळगावकर गेले असता त्यांनी हा किस्सा शेअर केला.

Recommended

PeepingMoon Exclusive