By  
on  

प्रतीक्षा लोणकर आणि वंदना गुप्ते २८ वर्षांनी पुन्हा एकत्र

मराठी रंगभूमीला अनेक समृद्ध कलाकृतींचा वारसा आहे. यातील एक कलाकृती म्हणजे प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'चारचौघी' हे नाटक. गंभीर विषयाचं दर्जेदार नाटक असलेलं 'चारचौघी' आजही नाट्यरसिकांच्या स्मरणात आहे. या नाटकात प्रतीक्षा लोणकर, वंदना गुप्ते, आसावरी जोशी, सुनील बर्वे, दीपा श्रीराम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. १५ ऑगस्ट १९९१ ला पुण्यामध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर झाला होता. 

'चारचौघी' नाटकानंतर प्रतिक्षा लोणकर आणि वंदना गुप्ते तब्बल २८ वर्षांनी नव्या मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' असं या नव्या मराठी नाटकाचं नाव आहे. 

स्वरा मोकाशी लिखित जिगीषा निर्मित 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' हे नव्या नाटकाचा पहिला प्रयोग १४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० ला गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. नाट्यरसिकांना या नव्या नाटकाची आतुर आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive