By  
on  

मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच येणार ‘एकपात्री सिनेमा’

आजवर आपण एकपात्री नाटकाविषयी ऐकलं असेल पण आता एकपात्री सिनेमाही येऊ घातला आहे. सिनेमा हा प्रकार एकपात्री असण्याची मराठी सिनेमाच्या इतिहासात ही खरंतर पहिलीच वेळ आहे. मेमोरेबल डेज प्रॉडक्शन तर्फे ‘मुषक’ या पहिल्या वहिल्या एकपात्री सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे.     

 

 

अभिनेता अक्षय टांकसाळे या सिनेमात असणार आहे. अक्षयचा सातारचा सलमान हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. एका बॅचलरच्या आयुष्यात उंदरामुळे उडालेला गोंधळ या सिनेमात पाहता येणार आहे. अक्षय जयसिंगराव शिंदे हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. प्रताप देशमुख यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

 

 

 वैभव जोशी यांनी या सिनेमाची गाणी लिहली आहेत.  आताच्या जनरेशनच्या समस्या, भावना यांच्याशी हा सिनेमा निगडीत असल्याने त्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive