By  
on  

रणबीर कपूरच्या पत्नी आणि आईच्या भूमिकेत दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री

रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाची चर्चा संपते न संपते तोच त्याच्या आगामी सिनेमाविषयीची बातमी समोर येताना दिसत आहे. रणबीर आगामी ‘शमशेर’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो एका डाकूच्या भूमिकेत असेल. विशेष म्हणजे या सिनेमात तो बाप आणि मुलाच्या डबल रोलमध्ये असणार आहे. या सिनेमात रणबीरसोबत एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. 

 

इरावती हर्षे असं या अभिनेत्रीचं नाव आहे. इरावतीने आजवर अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. आपला माणूस, टेक केअर, गुड नाईट, भाई व्यक्ती कि वल्ली हे तिचे अलीकडचे सिनेमे आहेत. भाई व्यक्ती कि वल्ली या सिनेमात तिने पु. लं.च्या पत्नीची म्हणजेच सुनीताबाई देशपांडेंची भूमिका साकारली होती. 

शमशेरा सिनेमात रणबीर आणि इरावतीसोबत संजय दत्त याचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. वाणी कपूर या सिनेमात रणबीरची नायिका असणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive