By  
on  

सखी-सुव्रतने शेअर केला त्यांना जोडणारा आणखी एक समान धागा

मराठी सिनेसृष्टीतील एक गोड कपल म्हणजे सखी आणि सुव्रत. दिल दोस्ती दुनियादारीमधून रसिकांच्या भेटीला आलेली ही जोडी रसिकांना भलतीच आवडली. त्यानंतर या दोघांनी ‘अमर फोटो स्टुडियो’ मध्येही एकत्र काम केलं. यावर्षी 11 एप्रिलला ही जोडी लग्नबंधनात अ‍डकली. 
सखी काही दिवसांपुर्वी लंडनला गेली होती. त्यामुळे अनेकदा या दोघांच्याही लंडन-मुंबई अशा वा-या सुरु असतात.

 

 

आताही या जोडीने एक खास फोटो शेअर केला आहे. या दोघांनीही सेम टॅटू काढून घेतला आहे. सखीने तिचा आणि सुव्रतचा एक फोटो शेअर केला आहे. यात सुव्रतने हातावर तर सखीने मानेवर सेम टॅटू काढून घेतला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना सखी म्हणते, ‘ नक्षत्र, रात्र-दिवस, ब्रम्हांड’. सखी-सुव्रतचा हा टॅटू कूल दिसत आहे यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive