स्नेहा आणि अनिकेत विश्वासराव हे मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल आहे. नुकताच या जोडीने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी या जोडीने मालदीवला भेट दिली.
यावेळी स्नेहाने येथील फोटो फॅन्सशी शेअर केले आहेत. या जोडीने 10 डिसेंबर 2018 रोजी लग्नाची गाठ बांधली.
खरं तर दोघंही एकाच क्षेत्रातील असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज आहे की काय अशी शंका फॅन्सना होती.
पण स्नेहाने हे अरेंज मॅरेज असल्याचा खुलासा केला. ही जोडी ‘हृदयात वाजे समथिंग’ या सिनेमात एकत्र दिसली होती.