बिग बॉसमधून नावारुपाला आलेला शिव ठाकरे आता एका नव्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. शिव ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमातून रसिकांच्या समोर येणार आहे. शिव या कार्यक्रमात कोळी नृत्य साकारणार आहे. त्याला चेतना भट साथ करणार आहेत. यावेळी खास नारळी पौर्णिमेच्या गाण्यावर नृत्य साकारलं जाणार आहे. जितेंद्र तुपे या नृत्याला गायकीची साथ करणार आहेत.
शिवने आतापर्यंत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. बिग बॉसमध्ये येण्यापुर्वी तो डान्स टीचर म्हणून काम करत असे. त्यामुळे डान्सचा स्टेज त्यासाठी फारसा नवीन नसावा. आता शिव स्टेजवर काय धमाल करतो ते लवकरच कळेल.