By  
on  

चंकी पांडे यांनी शेअर केला, ‘विकून टाक’ मध्ये अरब साकारण्याचा अनुभव

अभिनेता चंकी पांडे ‘विकून टाक’ या सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण करत आहेत. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या चित्रपटात चंकी पांडे महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात ते अरबाची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी चंकी यांनी अरबी व्यक्तीच्या भूमिकेविषयी आठवण सांगितली. ते म्हणतात, दोन वेळा अरबी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळी हे अरब अरबी सोडून वेगळीच भाषा बोलत असतात. अरबाची पहिली भूमिका मी ‘तेजाब’ या सिनेमात साकारली होती. 

 

 

अरबी व्यक्तीच्या वेशभुषेत मी त्यावेळी तेलुगु बोलत होतो. आता मी विकून टाक सिनेमासाठी ही भूमिका साकारतो आहे. हा अरब मराठी बोलणारा आहे. विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. 'विकून टाक' सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे.

 

 

समीर पाटील यांनी यापूर्वी 'पोस्टर बॉईज', 'पोस्टर गर्ल' असे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषिकेश जोशी, वर्षा दांदळे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. हा सिनेमा येत्या ३१ जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive