आर्या आंबेकरला मिळालं ‘गोल्ड मेडल’ पण नक्की कशात ते जाणून घ्या
लोभस चेह-याची अभिनेत्री, गायिका आर्या आंबेकर ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून भेटीला आली होती. यातील तिचा अभिनय चाहत्यांना खुपच आवडला होता. आता आर्याने चाहत्यांना आणखी एक गुड न्युज दिली आहे. आर्याला अलीकडेच गोल्ड मेडल मिळाले आहे. हे गोल्ड मेडल तिला एम. ए संगीतच्या पदवीदान समारंभात प्रदान केलं आहे. याशिवाय तिला सात आणखीही पुरस्कार मिळाले आहेत.