By  
on  

ही मराठी अभिनेत्री झळकणार या हिंदी मालिकेत, तुम्ही ओळखलं का हिला?

तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा तुळसकर. शिल्पाने आजवर अनेक मराठी सिनेमे, मालिका, हिंदी मालिका यामधून अभिनयाचं प्रदर्शन घडवलं आहे. आताही शिल्पा एका हिंदी मालिकेतून रसिकांच्या समोर येणार आहे. ‘दादी अम्मा… दादी अम्मा... मान जाओ’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. शिल्पाने ही बातमी स्वत: शेअर केली आहे.

 

 

रेखा असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. यात ती ग्रे शेडची व्यक्तिरेखा साकारत आहे. स्टार प्लस वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. शिल्पासोबत या मालिकेत मोहन जोशी देखील दिसणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive