By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार या आंतरराष्ट्रीय लेखिकेच्या नाटकात

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अलीकडेच दीपिका पदुकोणची मुलाखत घेताना दिसली होती. अभिनयाच्या जोरावर मराठी सोबतच हिंदी इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणा-या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. याशिवाय सलमानच्या ‘भारत’ सिनेमामध्येही ती झळकली होती. आताही सोनाली प्रेक्षकांसमोर येतीये ती एका नाटकामधून. हे नाटक हिंदी किंवा मराठी नाही तर इंग्रजी आहे.

 

 

जगप्रसिद्ध इंग्रजी लेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या ‘THE MIRROR CRACK’D’ या नाटकात ती काम करणार आहे. मेली स्टील या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत. या नाटकात तिच्यासोबत शेरनाज पटेल आणि डेंझिल स्मिथ यांच्या भूमिका आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सोनाली म्हणते, ‘माझं खुप दिवसापासून पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं आहे.’ सोनालीचे फॅन्सही तिला या नाटकात पाहण्यासाठी उत्सुक असतील.

Recommended

PeepingMoon Exclusive