ओळखा पाहू ही अभिनेत्री कोण, मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही उमटवतेय ठसा

By  
on  

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री. ग्लॅमरस आणि बोल्ड लुक्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून बिरुद मिरवण-या या अभिनेत्रीचा हा फ्लॅशबॅक फोटो पाहून तुम्हाला नक्कीच ही अभिनेत्री कोण ते ओळखता येईल. 

ही क्यूट अभिनेत्री आहे, सई ताम्हणकर . सईने व्हॅलेंटाईननिमित्त खास हा बालपणीचा आठवणीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हॉट अदा आणि बिनधास्त वागणं यामुळे सई रसिकांची तितकीच लाडकी आहे. सईचा मिडीयम स्पायसी हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय तर तिच्या मीमी या बॉलिवूड सिनेमाचीही बरीच चर्चा आहे. तर अलिकडेच तिच्या अश्लील उद्योग मित्र मंडळ या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झालं. 

आपल्या भूमिकांमधून रसिकांवर मोहिनी घालणा-या सईच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share