By  
on  

अप्सराचं उलट मंगळसूत्र पाहून चाहते पेचात, पुन्हा सोनालीच्या लग्नाच्या चर्चा

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची गेली कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. एवढच नाही तर कुणाल बेनोडेकर या दुबईत काम करणाऱ्या व्यक्तिला ती डेट करत असल्याचंही समोर आलं. याचवर्षी सोनालीचं लग्न होणार असल्याचही बोललं जातय. त्यातच सोनालीने नुकतच पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चांना आणखी उधाण आलय. 

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये सोनाली नववधूप्रमाणे नटलेली दिसत आहे. शिवाय तिच्या गळ्यात मंगळसूत्रही दिसतय. मात्र हे मंगळसूत्र उलट असल्याने या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव झाला. नववधू बहुदा अशा प्रकारे उलट मंगळसूत्र घालतात त्यामुळे सोनालीच्या या फोटोची प्रचंड चर्चा झाली. मात्र सोनालीने तिच्या या फोटोवरील एक कमेंटचं उत्तर दिलं. आणि हे उत्तर वाचून सोनालीचे चाहते चांगलेच पेचात पडलेत. 


एका चाहतीने सोनालीच्या या फोटोवर कमेंट केली की, “अगं ताई, तुझे मंगळसूत्रचं उलटे झाले.” यावर सोनालीने असं उत्तर दिलं की, “लग्नानंतर काही दिवस उलटच मंगळसूत्र घालतात”


सोनालीच्या या उत्तराने सगळेच पेचात पडले आहेत. मात्र सोनालीचे हे फोटो एका जाहिरातीसाठी केलेलं फोटोशूट असल्याचं तिच्या अकाउंटवरील इतर फोटोंवरुन वाटतय. 

तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता सोनालीकडूनच मिळतील.  

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive