By  
on  

यासाठी ‘इभ्रत’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलली

आण्णाभाऊ साठेंच्या दर्जेदार साहित्यांपैकी एक म्हणजे ‘आवडी’ ही कथा. ‘इभ्रत’ हा सिनेमा याच कथेवर बेतलेला आहे. या सिनेमात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. पण आवडी कथेच्या हक्कांवरून निर्माण झालेल्या वादामुळे या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

 

सतीश वाघेला यांनी निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. सतीश यांच्या मते,  आवडी' या कथेचे हक्क आण्णाभाऊ यांच्या सून सावित्री साठे यांनी त्यांना दिले आहेत. पण ‘इभ्रत’ च्या निर्मात्यांनी हा दावा खोडत हक्क आपल्याकडे असल्याचं सांगितलं आहे. या वादाची सुनावणी 21 तारखेला होणार असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्याने निर्मात्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive