By  
on  

अतरंगी शेजा-यांची गोष्ट दिसणार ‘नेबर्स’ सिनेमात

 मराठीत विज्ञान आणि कल्पना यावर बेतलेल्या सिनेमांच्या यादीत येण्यासाठी ‘नेबर्स’ हा सिनेमा सज्ज झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या सिनेमात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

एका तरुणीचं गुढरम्य वागणं आणि जोडला जाणारा परग्रहवासी असल्याचा संबध यातूनच खुलत जाणारी प्रेमकहाणी असं हा सिनेमाचं साधारण कथानक आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या सिनेमाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद स्टोरी यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.

श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून सिनेमाची तांत्रिक बाजू सर्वश्री विशाल तालकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. सिनेमाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. हा सिनेमा येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive