मेघा घाडगेने फोटोवर अश्लील कमेंट केल्याप्रकरणी केली तक्रार दाखल

By  
on  

अनेकदा अभिनेत्रींच्या सोशल मिडिया अकांऊटवर युजर्सच्या वाईट शब्दात कमेंट करत असतात. अनेक सेलिब्रिटी त्याकडे दुर्लक्ष करतानाही दिसतात. अभिनेत्री मेघा घाडगेबाबतही असाच प्रकार घडला आहे. मेघाने सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोअर स्वरुप पांडा नावाच्या युजरने अश्लील शब्दात कमेंट केली आहे. यावर मेघाच्या चाहत्यांनी त्या युजरवर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्याला चांगलं सुनावलंही आहे. 

या प्रकारानंतर मेघाने स्वरुप पांडा विरोधात मिरारोड पोलिसस्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याबाबत मेघाने संताप व्यक्त केला आहे. पोलीस मला या प्रकरणी सहकार्य करत नाहीत अशी तक्रारही तिने यावेळी केली आहे.   .

Recommended

Loading...
Share