आदिती गोवित्रीकर दिसणार या सिनेमात

By  
on  

अदिती गोवित्रीकर फक्त एक अभिनेत्री नाही तर एक साइकोलॉजिस्ट सुद्धा आहे. तिने "दे दना दन", पहेली, भेजा फ्राय आणि मराठी सिनेमा "स्माईल प्लिज" सारख्या चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे. अदिती गोवित्रीकरचा आगामी सिनेमा "कोई जाने ना" ज्यामध्ये ती कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

अदितीने तिचा आगामी सिनेमा "कोई जाने ना" बद्दल सांगितले, "सिनेमाची सुरुवात मिस्टर इंडियाचं गाणं "जिंदगी कि यही रीत है" पासून होते. आणि या सिनेमात मी दोन सुंदर मुलांच्या आईची भूमिका करत आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक अमीन हाजी आणि माझी मैत्री खूप पहिल्या पासून आहे आणि त्यांच्या सोबत एका सिनेमात काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता".  

 

कोई जाने ना सिनेमाच्या व्यतिरिक्त अभिनेत्री अदिती गोवित्रीकर किकू शारदा आणि हितेन तेजवानी यांच्यासोबत "ग्रे स्टोरीस" या वेब फिल्म मध्ये दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share