By  
on  

धम्माल विनोदाचा 'झोलझाल' होणार 1 मेला, वाचा सविस्तर

मराठी चित्रपट सृष्टी आणि विनोदी संहिता हे समीकरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी  नेहमीच मनोरंजनाची पर्वणी ठरली आहे. अशीच एक मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे 'झोलझाल'. युक्ती इंटरनेशनल यांचा आगामी 'झोलझाल' हा सिनेमा प्रेक्षकांना तुफान हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला होता. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मानस कुमार दास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.  

 पोस्टरवरून ही धमाल कॉमेडी एका आलिशान महालाच्या अवतीभोवती घडत आहे की काय? असा संदर्भ लागत असतांनाच, पोस्टरमध्ये बोल्ड अंदाजात उभी असलेली महिला आणि पाईप हातात घेऊन उभा असलेला व्यक्ती यांचा या महालाशी काही संबंध तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.  या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच. पोस्टरवर दिसणारी पैशाची बॅग, नेत्याची टोपी, पोलीस टोपी, गन  या छोट्या गोष्टींमुळे डोक्यात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. मात्र हा 'झोल' नक्की कोण करतोय? कसला 'झोल' आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला १ मे ला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजतीलच. 'झोलझाल' चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट असल्याचे समजत आहे.  

'झोलझाल' या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल  यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले असून अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवाजी डावखर असून मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive