21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये प्रसाद ओक तुमच्यासाठी करणार हे काम

By  
on  

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव थांबवावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वतच्या कुटुंबियांसोबत घालवत आहेत. पण याच दरम्यान अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

आपण सर्वच जण हे सुरक्षित राहण्यासाठी घरी थांबलो आहोत, पण घरी कंटाळा येणं स्वाभिवकच आहे. म्हणून प्रसाद ओक तुमच्यासाठी एक खास गोष्ट करणार आहे, ते त्याने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन जाहीर केलं आहे. प्रसाद ओक म्हणतो,  आजपासून २१ दिवस मी दररोज ४.३० वाजता लाईव्ह येणार आहे. कविता, गाणी व किस्से तुम्हाला मी ऐकवणार आहे. उद्देश फक्त तुमचं मनोरंजन. कला हा माझा धर्म आहे व तो मी पाळणारच.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

काय मग, तुम्ही घेणार का नाही प्रसाद ओक यांच्या गाणी, कविता व किस्स्यांचा आस्वाद ? 

Recommended

Loading...
Share