By  
on  

जागतिक रंगभूमी दिन: वैदेही परशुरामीने शेअर केली ही खास आठवण

आज जागतिक रंगभूमी दिन आहे. मानवी अभिव्यक्तीच्या सगळ्यात मुलभूत साधनांपैकी एक म्हणजे नाटक. अनेक महान कलाकारांची मातृसंस्था म्हणजे रंगभूमी. आज जागतिक रंगभूमी दिन आहे. याचं औचित्य साधून अभिनेत्री वैदेही परशुरामीने रंगभूमीवरील पहिल्या सादरीकरणाचा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. वयाच्या सहाव्या वर्षी वैदेहीने हे सादरीकरण केलं आहे.

 

 

 यावेळी कॅप्शनमध्ये वैदेही म्हणते, ‘रंगभूमीवरचं पहिलं पाऊल...वय वर्ष ६...तेव्हा पासून आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात रंगभूमीशी नाळ जोडलेली आहे...मी खूप भाग्यवान आहे! जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!!!’ वैदेही ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा साकारून प्रकाशझोतात आली. याशिवाय रणवीर सिंगच्या सिंबामध्येही छोटी पण प्रभावी भूमिका साकारली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive