By  
on  

प्रार्थना आणि आरोहच्या जोडीचा हा सिनेमा माहितीय , आता घरबसल्या पाहा हा सिनेमा

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

बिग बॉस मराठी फेम अभिनेता आरोह वेलणकरनेसुध्दा अशाच जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही वर्षांपूर्वी आरोह व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यासह विराजस कुलकर्णीची भूमिका असलेला हॉस्टेल डेज हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता.त्या सिनेमातले फोटो शेअर करत आरोहने हा सिनेमा आता मॅक्स प्लेयरवर घरबसल्या अगदी मोफत पाहता येणार आहे, अशी पोस्ट केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive