By  
on  

करोनाचं सावट..जयवंत वाडकरांच्या इमारती परिसरात सापडले करोनाचे रुग्ण

करोनाचं सावट सध्या संपूर्ण जगावर आहे. या संकटाशी दोन हात करण्याकरिता आपल्या सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतायत. तरी भय इथले संपत नाही...दररोज करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा एक हजार २५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं असून उद्योगांसह सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे, यामुळे आर्थिक कोंडीलाही सामोरं जावं लागत आहे. 

गोरेगाव येथील बिबींसारनगरही लॉकडाऊनमुळे संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तेथे करोनाचा एक रुग्ण आढळल्याची माहिती आहे. म्हणूनच संपूर्ण खबरदारीसाठी हा परिसर बंद करण्यात आला आहे. बिंबीसारनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक मराठी कलाकार वास्तव्यास आहेत. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी या संदर्भात एक व्हिडीओ व एक फोटो सोशल मिडीयावरुन पोस्ट केला आहे. परदेशातून आलेल्यांमुळे आम्हा इतर नागरिकांवर करोनाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaywant Pandurang Wadkar (@jaywantwadkar) on

अनेक परदेशी नागरिक बाहेर बिनधास्त फिरताना आढळतायत. त्यांना सद्य परिस्थितीचं काहीच गांभिर्य दिसत नाही. हे यावरुन समजतं. पण ते नाहक इतरांचा जीव असल्या कृत्यांमुळे धोक्यात टाकत आहेत. 

 


 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive