By  
on  

अश्विनी भावे आगामी ‘द रायकर केस’ या वेबसिरीजमधून येणार भेटीला

अनेक मराठी सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडलेल्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अश्विनी सध्या कॅलिफॉर्नियात राहतात. दोन मुलं आणि पती सोबत अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी आता कमबॅकसाठी सज्ज झाल्या आहेत. अश्विनी ‘द रायकर केस’ या वेबसिरीज मधून कमबॅक करणार आहेत. या वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांचा डिजीटल डेब्युही होईल.

 

या वेबसिरीजमध्ये त्यांच्यासोबत अतुल कुलकर्णी, मनवा नाईक, ललित प्रभाकर हे कलाकारही दिसतील. एक खुन आणि एका कुटुंबाभोवती फिरणारं रहस्य या सिरीजमध्ये पाहता येईल. ही वेबसिरीज 9 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या अमेरिकेतही लॉकडाऊन असल्याने अश्विनी भावे स्वयंपाक, वाचन आणि बागकामात करताना पाहायला मिळतायत.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive