By  
on  

प्रसाद ओक मुंबई पोलिसांना म्हणतोय, 'तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत'

सध्या बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेइंडस्ट्री सर्वांकडूनच आपले 'रिअल हिरो' मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिवस-रात्र तहान-भूक विसरुन स्वत:च्या कुटुंबापासून दूर फक्त नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस जीवाचं रान करतायत. करोनारुपी संकटापासून देशाला वाचविण्यासाठी त्यांचे अअथक प्रयत्न सुरु आहेत.एक सुजाण व जबाबदार नागरिक म्हणून त्यांना सहकार्य करणं व त्यांच्या कार्याचा सन्मान राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 

सई ताम्हणकर, सिध्दार्थ चांदेकर यानंतर आता अष्टपैलू अभिनेता प्रसाद ओक  ह्याने सुध्दा मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत प्रसाद म्हणतो," ही वेळ आहे मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानण्याची...त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची...आपल्या सुरक्षेसाठी आणि आपली काळजी घेण्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून... मुलाबाळांपासून दूर राहून... ते अहोरात्र झटत आहेत...आपण सुरक्षित आहोत ते केवळ त्यांच्या अथक परिश्रमामुळे. अशा कर्तव्यनिष्ठ मुंबई पोलिसांना मनापासून सलाम...Thank You मुंबई पोलीस..Love You मुंबई पोलीस...सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ही वेळ आहे मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानण्याची...त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची...आपल्या सुरक्षेसाठी आणि आपली काळजी घेण्यासाठी स्वतःच्या कुटुंबापासून... मुलाबाळांपासून दूर राहून... ते अहोरात्र झटत आहेत...आपण सुरक्षित आहोत ते केवळ त्यांच्या अथक परिश्रमामुळे. अशा कर्तव्यनिष्ठ मुंबई पोलिसांना मनापासून सलाम. Thank You मुंबई पोलीस Love You मुंबई पोलीस सद्रक्षणाय खलनिग्रहणाय Jai Hind! @mumbai.police_ @dgpmaharashtra #ThankYouMumbaiPolice #ThankYouMaharashtraPolice @sonymarathi @sonytvofficial @sabtv @amitphalke @ajaybhalwankar

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

खरंच करोनारुपी संकटाशी सामना करताना नागरिकांसाठी खंबीरपणे उभ्या राहणा-या मुंबई पोलिसांचं मनोधैर्य वाढविण्याची सध्या प्रचंड गरज आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive