प्रियाने पोस्ट केला उमेश कामतसोबतचा हा फोटो, या वेब सिरीजमध्ये झळकले एकत्र

By  
on  

अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट ही प्रेक्षकांना आवडणारी रिल आणि रियल लाईफ जोडी. यांना ऑनस्क्रिन एकत्र पाहणं ही देखील एक वेगळी मजा असते. शिवाय ऑफस्क्रिनही त्यांचे फोटो, व्हिडीओ या सगळ्या गोष्टी मजेशीर असतात. मुळात या दोघांची केमिस्ट्री उत्तम असते आणि ती दोन्ही ठिकाणी पाहायला मिळते. 

‘आणि काय हवं’ या वेब सिरीजमध्ये या दोघांच्या जबरदस्त केमिस्ट्री अनुभवायला मिळाली. या पहिल्या सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाला. याचं दुसरं सिझनही याच वर्षी प्रदर्शित झालं. आणि दुसऱ्या सिझनलाही चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या लॉकडाउनमध्ये प्रिया याच सिरीजच्या आठवणी मिस करतेय. आणि म्हणूनच तिने या चित्रीकरण दरम्यानचा उमेशसोबतचा हे छान फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्येही दोघांची जोडी छान दिसतेय. आणि म्हणूनच या फोटोलो हजारो लाईक्स मिळत आहेत. मात्र या फोटोसोबत प्रियानं चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे. ती पोस्टमध्ये लिहीते की, “आणि काय हवं 2 च्या शुटिंग दरम्यानचे काही सर्वोत्कृष्ट क्षण. बघुयात तुम्ही सांगू शकता का, की हे कॉश्यूम आम्ही सिझन 2च्या कोणत्या भागासाठी आणि सीनसाठी घातले होते ?”
प्रियाने हा प्रश्न विचारला आणि चाहत्यांनी पटापट उत्तरं द्यायलाही सुरुवात केली. मात्र या सिरीजमधील हा धमाल सीन चाहत्यांना प्रचंड आवडला असेल एवढं नक्की.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#throwback When I could travel.

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

Recommended

Loading...
Share