By  
on  

मराठी सिनेसृष्टीतल्या कामगारांना माधुरी दीक्षितने दिला मदतीचा हात

जागतिक करोना महामारीमुळे बंधनकारक असलेला लाँकडाऊन, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. हातावर पोट असलेल्या अनेक मजुरांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना आता दोनवेळ काय खायचं हा प्रश्न सतावतोय, कारण हाताला काम नाही तर पोटाला अन्न नाही अशी त्यांची गत झाली आहे.

याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य  किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केली. आतापावेतो २५०० सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोचवली गेली आहे. 

महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी व संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती व बाँलीवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले  होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित या धावून आल्या व त्यांनी अ .भा.म.चि. महामंडळाला भरघोस मदत केली आहे व त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ व कलावंतांचे दुःख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांनी इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.

अ.भा.म.चित्रपट महामंडळातर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी माधुरी दीक्षित यांचे आभार मानले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive