By  
on  

अपुर्वा नेमळेकरच्या बाबांनी अशा प्रकारे केलं तिच्या पदार्पणाचं कौतुक

लॉकडाऊनमुळे सध्या मालिका आणि सिनेमांचं शुटिंग बंद आहे. त्यामुळे मराठी वाहिन्यांनी त्यांच्या जुन्याच मालिका पुन्हा एकदा सुरु होताना दिसत आहे. अपुर्वा नेमळेकरने ‘आभास हा’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. ही मालिका झी मराठीवर  पुन्हा सुरु होताना दिसत आहे. 2011ला मालिकेचं मुळ प्रसारण झालं होतं. 

 

 

यावेळी अपुर्वा नेमळेकरच्या बाबांनी हटक्या पद्धतीने अपुर्वाचं पदार्पण साजरं केलं आहे. त्यांनी मालिकेची जाहिरात असलेला पेपर लॅमिनेट करून अपुर्वाचा कपाटावर लावला होता. आजही त्याची आठवण आहे. अपुर्वा हा फोटो शेअर करताना म्हणते, ‘माझी पदार्पणाची मालिका ‘आभास हा’ झी मराठीवर प्रसारित झाली होती. माझ्या बाबांनी त्यावेळी आलेल्या जाहिरातीचं पान लॅमिनेट करून माझ्या कपाटावर लावलं आहे. अजूनही ते तसच आहे.’ याशिवाय तिने आराधना, रात्रीस खेळ चाले या मालिकांमधूनही काम केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive