By  
on  

सुव्रत जोशीने चाहत्यांना विचारला हा प्रश्न तुम्हाला येतंय का उत्तर

देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. दरम्यान सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हे घरीच राहणं पसंत करत आहेत. सेलिब्रिटीही घरी असले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात. 
सुव्रत जोशी सोशल मिडियाच्या माध्यमातून चक्क सातासमुद्रा पलीकडूनही चाहत्यांशी संवाद साधतो आहे.

 

 

अनेकदा तो मजेशीर पोस्टही शेअर करत असतो. आताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘वरील चित्रात एक प्राणी दडला आहे. पाहू तुम्ही ओळखू शकता का? प्राणी ओळखून त्याचे नाव कमेंट्स मधे लिहा!’ आता सुव्रतच्या या पोस्टवर नेटिझन्सनी भन्नाट रिप्लाय दिले नाहीत तर नवलच !  सखी आणि सुव्रत सध्या थेट लंडनमधून ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत सहभागी होत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive