By  
on  

पुजा सावंत म्हणते, ‘आयुष्यात हा मित्र नसेल तर तुम्ही आयुष्य जगलाच नाही’

अभिनेत्री पुजा सावंत Animal lover  आहे. ती मांजरी आणि पेट डॉग्जची पेट पॅरेंटही आहे. अलीकडेच तिने बीचवर एका पपीसोबत खेळतानाचा फोटो शेअर केला होता. आताही तिने आणखी एक व्हिडियो शेअर केला आहे.  या व्हिडियोमध्ये पुजा दोन जर्मन शेफर्ड कुत्र्यांसोबत खेळताना दिसत आहे.

 

 

हे दोन डॉग तिला पाहून धावत तिच्याकडे येताना दिसत आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘जर कुत्रे तुमचे चांगले मित्र नसतील तर, अजूनपर्यंत तुम्ही आयुष्याचा आनंद घेतला नाही.’  पुजा यापुर्वी ‘जंगली’ नावाच्या सिनेमात दिसली होती. यावेळी सिनेमातील ‘शंकर’ या हत्तीशी तिची मैत्रीही झाली होती. पुजाने यावेळी शंकरची सोंड रंगवतानाचा व्हिडियोही शेअर केला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive