By  
on  

माधवी निमकरचा योगा पाहून नेटिझन्स म्हणाले, हात-पाय आहेत की रबर !

अभिनेत्री माधवी निमकर फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या लॉकडाऊनमध्ये माधवी अनेक अवघड आसनं करून फॅन्सनाही चकित करत आहे. अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगाची प्रॅक्टीस करत आहे. अगदी कठीण आसनंही ती लीलया करू शकते. अलीकडेच तिने अशा आसनाचा फोटो शेअर केला आहे.

 

 

तिचं हे अवघड आसन पाहून नेटिझन्सनी चक्क तोंडात बोटं घातली. या फोटोंना कॅप्शन देताना माधवी निमकर म्हणते, ‘'वेगवेगळ्या योगासनांमुळे तुम्ही शरीरात एका विशिष्ट शक्ती निर्माण करता.'माधवी निमकर आपल्याला माहीत आहे ती ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत. याशिवाय माधवीने या गोजिरवाण्या घरात, उन पाऊस, जावई विकत घेणे आहे, अनामिका अशा मालिकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय संघर्ष, धावाधाव, सगळं करून भागले या सिनेमांमध्येही काम केलं आहे.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive