वादळाच्या आगमनाने का होईना पण सगळीकडेच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा हा सर्जनाचा ऋतू आहे. मनाला आनंद देणारा आणि सभोवताली हिरवी चादर पसरणारा हा ऋतू म्हणून तर हवाहवासा वाटतो.
यामुळेच गायिका प्रियांका बर्वेही या पावसाळ्यात चाहत्यांसाठी खास भेट घेऊन आली आहे.
‘आला घन भरलेला’ असे बोल असलेलं गाणं प्रियांका चाहत्यांच्या भेटीला घेऊन आली आहे. हे गाणं प्रियांकासाठी खास आहे कारण या गाण्याचे बोल तिच्या आईने लिहिले आहे. याबाबतची पोस्ट प्रियांकाने शेअर केली आहे. प्रियांका म्हणते, ‘आईनं लिहिलेलं गाणं, सत्यजीत चं म्यूज़िक आणि नुकताच येऊ घातलेला पावसाळा. Combination एकदम मस्त जमलंय.’ या गाण्याला सत्यजित केळकर यांनी संगीत दिलं आहे. तर सागरिका म्युझिकची प्रस्तुती आहे.