By  
on  

देवदत्त नागे म्हणतो, ‘ आम्हाला सुरक्षित ठेवल्याबाबत देवाचे आभार’

काल दिवसभर एकच चर्चेचा विषय होता ते म्हणजे ‘निसर्ग चक्रीवादळ’. महाराष्ट्राच्या किनार पट्टीला धडकणार असलेल्या या वादळाने सर्वांनाच धडकी भरवली होती. बुधवारी दुपारी 1 वाजता अलिबागजवळ हे चक्रीवादळ धडकलं. वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

 

मुळच्या अलिबागच्या असलेल्या अभिनेता देवदत्त नागेने घराजवळील नुकसानीचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच देवदत्तने सुरक्षित असल्याचंही शेअर केलं आहे. हे फोटो शेअर करताना वादळापासून सुरक्षित ठेवल्याबद्द्ल देवदत्तने देवाचे आभारही मानले आहेत. 

सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला. चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive