आज प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतला आहे. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावतोय. स्वत:कडे पाहताना आजूबाजूचं पाहणं आपण विसरलोय. महत्त्लाचं म्हणजे दुस-यांना मदत करण ही वृत्ती हळूहळू लोप पावत चाललीय आणि त्यातही गरजवंतांच्या मदतीसाठी धावणंसुध्दा कुठेतरी हरवत चालल्याचं दिसतं. पण यालाच छेद पाडणारा एक व्हिडीओ प्रसिध्द अभिनेता रितेश देशमुखने नुकताच शेअर केला आहे.
रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ खुप काही सांगून जातो. माणसांनी भरलेली एक एसटी निघून जात आहे. तर एका स्टॉपवर एक अंध व्यक्ती बसची वाट पाहत उभा आहे. एक महिला त्या धावत जाणा-या एसटीला थांबवते आणि त्या अंध व्यक्तीला त्या बसमध्ये चढण्यास मदत करते. रितेश म्हणतो, प्रत्येकानेच या महिलेसारखं वागायला हवं.सलाम तिच्या मदतीला.
We should all aim to be like her when no one is watching. #Salute pic.twitter.com/8j1Ui3mwDZ
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 9, 2020
रितेश नेहमीच बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर त्याचे मत मांडताना दिसतो. तसेच तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याच्यावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.