म्हणून अद्वैत दादरकरला आठवल्या ‘अशी ही बनवा बनवी’ मधील लीलाबाई काळभोर

By  
on  

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेचा खास असा चाहता वर्ग आहे. या मालिकेत चालणारी राधिका आणि शनायाची जुगलबंदीही अनेकांना आवडते. यासोबतच या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र म्हणजे सौमित्र. सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो असून आसपास धुसर वलय आहे. या पोस्टला त्याने कॅप्शनही भन्नाट दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘नवाबनवी मधील लीलाबाई काळभोर ह्यांच्या उजव्या डोळ्यातून दिसणारा मी..’  

 

 

बनवा बनवीमध्ये नयनतारा यांनी लीलाबाई काळभोर यांची भूमिका साकारली होती. एका डोळ्याचं मोतीबिंदूचं झालं असल्याने त्यांनी एका डोळ्याला दिसत असलेल्या घरमालकिणीची भूमिका अशी ही बनवा बनवीमध्ये साकारली होती.

Recommended

Loading...
Share