नीट राहायचे कळलं का महाराष्ट्रात राहते... नेटक-यांनी घेतला या मराठी अभिनेत्रीचा खरपूस समाचार

By  
on  

आपल्या वादग्रस्त वक्तव्य व पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा नेटक-यांच्या रडारवर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं लिखाण केल्याने  केतकीचा खरपूस समाचार घ्यायला नेटिझन्सनी  सुरुवात केली आहे. या पोस्टमध्ये केतकीने तिचे विचार मांडले  आहेत,  त्यामुळे ती पुन्हा एकदा सोशल मिडीयावर वादाच्या भोव-यात सापडली आहे. तिला आता प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 

 

नीट राहायचे कळलं का महाराष्ट्रात राहते....अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळत नसेल तर असले फालतु लिखाण करावे लागते.... सध्या.काम नसल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलं, अशा  नानाविविध प्रकारच्या कॉमेंट्समधून नेटिझन्सनी केतकीचा खरपूस समाचार घेतला आहे. 

 

 

सोशल मिडीयावरुन रोष ओढवून घ्यायची ही काही केतकीची पहिली-दुसरी वेळ नाही. यापूर्वीसुध्दा अनेक वादग्रस्त पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. 

Recommended

Loading...
Share