By  
on  

देवा श्री गणेशा’ मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारतीये ही भूमिका

 कोरोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. पण उत्सवाच्या उत्साहात मात्र कोणतीही कमतरता नाही. स्टार प्रवाह वाहिनीवर गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ही केवळ ११ विशेष भागांची मालिका आहे. या मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री मोटे दिसणार आहे.

 

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना तिने ही बाब शेअर केली. महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ तिवारी यांच्या स्वस्तिक प्रोडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive